Elemental Iron

Elemental Iron बद्दल माहिती

Elemental Iron वापरते

Elemental Ironकसे कार्य करतो

"Elemental Iron शरीराच्या रसायनासोबत प्रतिक्रिया करुन शरीरात शोषले जाते आणि शरीरात लोहाच्या कमी पातळीत सामिल होते. आयरन प्रिपरेशन, ऍंटीएनीमिक आणि आयरन सप्लीमेंट नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. आयरन आपल्या शरीरात हीमोग्लोबिन (ऑक्सीजन घेऊन जाणारे आणि रक्ताला लाल रंग देणारा पदार्थ) आणि मायोग्लोबिन (कार्य करणा-या स्नायुंना ऑक्सिजन देणारे स्नायु प्रोटीन) निर्माणासाठी आणि ऊतींना ऑक्सीडीकरण प्रक्रियांसाठी अतिशय आवश्यक असते. हे अनेक अनिवार्य संप्रेरक, न्यूट्रोफिलच्या क्रियाशीलतेमध्ये सहाय्य करते आणि चयापचयात महत्वपूर्ण भूमिका देखील निभावते.

Elemental Iron चे सामान्य दुष्प्रभाव

उलटी, अन्न खावेसे न वाटणे, काळ्या/गडद रंगाची विष्ठा, बद्धकोष्ठता, अतिसार

Elemental Iron साठी उपलब्ध औषध

  • ₹36 to ₹363
    Cadila Pharmaceuticals Ltd
    11 variant(s)
  • ₹185 to ₹286
    Corona Remedies Pvt Ltd
    3 variant(s)
  • ₹35 to ₹243
    Shreya Life Sciences Pvt Ltd
    4 variant(s)
  • ₹88 to ₹247
    Goddres Pharmaceuticals Pvt Ltd
    4 variant(s)
  • ₹40 to ₹263
    Venus Remedies Ltd
    4 variant(s)
  • ₹262
    Samarth Life Sciences Pvt Ltd
    1 variant(s)
  • ₹249
    Anax Lifescience
    1 variant(s)
  • ₹30 to ₹260
    Elder Pharmaceuticals Ltd
    3 variant(s)
  • ₹250
    Maneesh Pharmaceuticals Ltd
    1 variant(s)
  • ₹210
    Quick Heal Life Sciences
    1 variant(s)

Elemental Iron साठी तज्ञ सल्ला

लोह मिश्रणे (फेरस सॉल्ट्स) सुरु करु नका किंवा पुढे चालू करु नका आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याः
  • जर तुम्हाल लोह सप्लिमेंट्सची अलर्जी असेल
  • जर तुम्हाला लोहाच्या कमतरतेनं निर्माण न झालेली रक्ताल्पता असेल
  • जर तुमच्या त्वचेवर काळपट खुणा असतील ज्याचा अर्थ शरीरात खूप अधिक लोह जमा झाला आहे असा होतो (हिमोक्रोमॅटोसिस किंवा हिमोसिडेरोसिस)
  • जर तुम्हाला आतड्यांना बाधक कोणताही गंभीर रोग असेल किंवा होता, ज्यामध्ये पोटातील व्रण, तुमच्या शौचाची दाहकारक स्थिती,
  • जर तुम्हाला लघवीमध्ये रक्त दिसले
  • जर तुम्हाला काही शर्करा सहन होत नसतील असे तुमच्या डॉक्टरांनी सांगितले असेल
लोहाच्या इंजेक्शनमुळे तीव्र आणि काहीवेळेस जीवाला घातक अलर्जिक प्रतिक्रिया किंवा अतिशय कमी रक्तदाब होऊ शकतो. तुम्हाला डोके हलके (जसे आपण आता मरणार आहोत) वाटले किंवा अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तिला लगेच सांगा.
तुम्हाला लोहाच्या इंजेक्शनची अलर्जी असेल किंवा लोहाच्या कमतरतेमुळं नसणारी रक्ताल्पता असेल तर तुम्ही हे इंजेक्शन घेऊ नये.
तुम्हाला अलर्जिक प्रतिक्रियेची यापैकी कोणतीही चिन्हे असतील तर तत्काळ वैद्यकिय मदत घ्या): फोड, श्वास घेण्यास अडचण, तुमचा चेहरा, ओठ, जीभ किंवा घशाची सूज.
लोहाच्या इंजेक्शनचा रंग बदलला असेल किंवा त्यात कण असतील तर ते वापरु नका. औषध विक्रेत्याकडून नवे औषध घ्या.