Alprostadil

Alprostadil बद्दल माहिती

Alprostadil वापरते

Alprostadil ला पेटंट डक्टस आर्टरिओसिस (PDA)च्या उपचारात वापरले जाते.

Alprostadilकसे कार्य करतो

एल्प्रोस्टाडील, शरीरात आढळणा-या नैसर्गिक पदार्थाप्रमाणे आहे ज्याला प्रोस्टाग्लैंडीन ई1 म्हटले जाते आणि हे वॅसोडायलेटर नावाने ओळखल्या जाणा-या श्रेणीशी संबंधित आहे. हे रक्तवाहिन्यांना रुंद करते आणि लिंगात रक्तप्रवाह वाढवतो ज्यामुळे त्याचे उथ्थान होण्यास सुलभता होते.

Alprostadil चे सामान्य दुष्प्रभाव

अँप्निआ (झोपेत श्वास थांबणे), ताप, आकडी येणे, प्रधावन /त्वचेवर लाली येणे, छातीच्या ठोक्यांमध्ये अनियमितता, अतिसार, जखमेत पू होणे

Alprostadil साठी उपलब्ध औषध

Alprostadil साठी तज्ञ सल्ला

  • लैंगिक संबंधांपूर्वी लिंगाला ताठरता येण्यासाठी अल्प्रोस्टॅडिल शिश्नात इंजेक्शनद्वारे किंवा शिश्नाच्या लघवीच्या जागेत ठेवता येण्याजोग्या गोळीद्वारे दिले जाते. अल्प्रोस्टॅडिल कसे वापरावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • 24 तासांच्या अवधीत अल्प्रोस्टॅडिलची एकपेक्षा अधिक मात्रा घेऊ नका.
  • चार तासांपेक्षा जास्त वेळ लिंगाची ताठरता जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण त्यामुळे नपुंसकतेसारखी कायमस्वरुपी लैंगिक समस्या निर्माण होऊ शकते.
  • अल्प्रोस्टॅडिलमुळे तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला लैंगिक सबंधातून संक्रमित होणा-या रोगांपासून ( उदा. एडस्) किंवा रक्तातून होणा-या( अदा. हिपॅटायटिस बी) रोगांपासून संरक्षण मिळत नाही. त्यामुळे असे संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या.
  • अल्प्रोस्टॅडिलमुळे तुमच्या जोडीदाराच्या गर्भधारणेची शक्यता टळू शकत नसल्याने योग्य आणि विश्वासार्ह गर्भनिरोधक वापरा.
  • अल्प्रोस्टॅडिल वापरत असताना तुमची डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
  • अल्प्रोस्टॅडिल घेतल्यानंतर चक्कर येऊ शकते म्हणून वाहन चालवणं किंवा ज्यामुळे शरीराला इजा होईल असं कुठलंही काम करू नका.
  • मद्यामुळे अल्प्रोस्टॅडिलच्या इतर दुष्परिणामात ( साइडइफेक्टस्) भर पडू शकते, म्हणून मद्यपान करू नका.
  • तुमची जोडीदार गर्भवती किंवा स्तनदा असेल तर डॉक्टरांना त्याविषयी माहिती द्या.